Only Study Official ©
11.9K subscribers
1.92K photos
41 videos
592 files
586 links
askteamonlystudy@gmail.com
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
🛑*रेंगाळलेल्या MPSC चा बळी स्वप्नील लोणकर* 🛑

🔷मागच्या काही दिवसांत या शिर्षकाशी मिळत्या जुळत्या शिर्षकाची बातमी सर्वांनीच कुठल्या ना कुठल्या प्रसार माध्यमातून वाचली किंवा ऐकली असेलच. मीही साम टीव्ही वरील स्वप्नीलच्या घरच्यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ बघितला. त्यांचं ते दुःख बघुन आणि स्वप्नील चे स्वप्न आणि आतापर्यंत अगदी यशस्वी पणे जगलेल्या व्यक्तीचे असे खचुन आत्महत्या करणे याची हकीकत ऐकुन क्वचितच कुणाच्या डोळ्यात पाणि येणार नाही.😔 असेच अनेक स्वप्नील आहेत जे अश्याच परिस्थिती मधून जात आहेत. परीक्षांच्या वेळापत्रकांचा हा परिक्षार्थ्यांमध्ये सामर्थ्य असुनही खचविण्याचा खेळ मग या खेळामागे कारण कुठलंही असो कोरोनाच हे नैसर्गिक संकट किंवा त्याआड शासनाचं या बाबीकडे केलेलं दुर्लक्ष , हे अतिशय संतापजनक😠 आहे. याबाबत आवाज उठवलाच जायला हवा आणि या परिक्षा विहित वेळेत होऊन आपल्या देशाच्या युवा पिढीच्या भविष्याशी खेळला जाणारा हा खेळ थांबायलाच हवा😊.

🔷पण याही पलीकडे या विषयावर आपण विचार करण्याची निष्णात गरज आहे. स्वप्नील ची पूर्व व मुख्य परीक्षा (सन २०१९) पहिल्याच वेळी निघालेली होती आणि सन २०२० ची पूर्व परीक्षाही✌️. त्याला स्वतःच्या स्वप्नपूर्ती चा आनंद आप्तेष्टांच्या डोळी उत्तरावण्याचीही कला अवगत होती. प्लाझ्मा दान करून २८ जणांचे जीव वाचवूनही आणखी ७२ लोकांचे जीव वाचण्याच्या स्वप्नावरून त्याची समाजाच्या प्रति असलेल्या बंधिलकीची असलेली जाणीव त्याप्रतिची तळमळ प्रत्ययास येते😊. एवढं सर्व असूनही आत्महत्या करण्या आधी त्याने लिहून ठेवलेल्या पत्रातुन अस कळत की तो स्वतःला आपण घरच्यांच्या किंबहुना जवळच्या सर्व लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता कुठेतरी कमी पडतोय अस वाटतंय. वय वाढत जातंय आणि आत्मविश्वास हरवल्यासारखं जाणवतं. स्वतःच्या क्षमतांवर चा विश्वास गमावलेला वाटतोय. आतापर्यंत सकारात्मकतेने तग धरला पण आता काहीच उरलं नाही या भावने मुळे आत्महत्या करतोय😔.......

🔷 यामागचं सर्वांत प्रगल्भ कारण काय तर आपण सर्वच आयुष्यात एक ध्येय ठरवुन त्याची पुर्तता करते वेळी, आपण ठरवलेल्या वेळेत ते ध्येय पूर्ण न होण किंवा ते पूर्ण करतांना असंख्य अडचणी येण यालाच ध्येय पूर्ण न होणं मानतो आणि आयुष्याच्या या एका भागालाच संपूर्ण आयुष्य समजुन घेतो. यावेळी परीक्षा असते आपल्या चिकाटीची💪. कुठलंही मोठं ध्येयं गाठायचं असलं तर या गुणाला बाजूला सारून ते मिळवणं शक्य नाही.

🔷 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची पाठ थोपटण्याची☺️. दुसऱ्यांनी काही चांगलं केलं तर ते आपल्याला लगेच लक्षात येत ४ दा त्याच स्मरणही होतं जरा तुम्ही जळकुकडे नसाल तर त्या व्यक्तीची भरभरून स्तुतीही करून घेता.परंतु स्वतः बाबत हे मात्र आपण विसरतो. मुख्यतः ठरवलेलं एक ध्येयं साध्य करताना अडचणी येत असताना तर आयुष्याच्या बाकी क्षेत्रामध्ये आपण किती पटाईत पणे खेळतोय आणि त्यासाठी आपण स्वतःचे किती कौतुक करावे याकडे कधी आपलं लक्ष वळवलेलंच नसत. जर या गोष्टीकडेही आपण आपलं लक्ष वळवणं शिकलो तर अडखळलेल्या ध्येयपूर्तीसाठी लागणारा आत्मविश्वास आणि चिकाटी टिकवून ठेवण्यास आपण सक्षम होऊ शकु. जे आपण आहोत त्यातल्या आपल्या कमतरतांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वारंवार आपल्या सक्षम बाजुवर भर देऊन स्वतःवर प्रेम❤️ करायला शिकणं ही प्रत्येकाची गरज आहे.

🔷 शेवटी काय तर आपल्याला खचविण्या करिता कधी सरकारचे धोरण तर कधी निसर्गाचा रौद्र पणा येतंच राहणार😢. पण स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव प्रत्येक दिवशी स्वतःला करून देऊन दररोज उत्साहपूर्ण जगण्याची कला उराशी बाळगणं शिकुन घेऊया आणि कितीही कठीण परिस्थिती येऊदेत खचून न जाता खंबीरपणे 💪 सामना करून या अद्वितीय जीवनाचा आस्वाद घेण्यात स्वतःला पारंगत बनवूया. ✌️✌️
-प्रियंका चोपडे


Join @only_stdy
5_6287289907492684494.pdf
523.9 KB
💥💥 MES Prelims 2020
Final Answer Key 💥💥

Join @only_stdy
2987.pdf
10.3 MB
Maharashtra Public Service Commission

Rules of Procedure as amended upto January 2021

@only_stdy
♦️ Kindly Email On Following Official Email-IDs

cm@maharashtra.gov.in , psec.energy@maharashtra.gov.in, psec.gadservices@maharashtra.gov.in ,
cgmhr@mahatransco.in ,
cecivil@mahatransco.in ,
pptanpure@gmail.com ,
dr.nitinraut09@gmail.com ,
kbhoyar1767@gmail.com


@only_stdy


Content given below ⬇️⬇️
प्रती,
मा.नितीन राऊत साहेब
ऊर्जामंत्री ,
महाराष्ट्र राज्य.


विषय - ऊर्जा विभागातील महापारेषण (Mahatransco) मधील सहायक अभियंता हे पद सरळसेवाद्वारे भरण्यात यावेत व दहावीला मराठी विषय असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत..

महोदय ,
वरील विषयास अनुसरून सांगू इच्छितो की , महापारेषण (Mahatransco) मधील सहायक अभियता GATE मार्फत घेण्याचे नियोजन केले आहे.
( Mahatransco Circular - 537 Dated-29/8/2018)

तरी महापारेषण सहायक अभियंता हे पद GATE मार्फत न घेता सरळसेवेद्वारे भरण्यात यावी व दहावीला मराठी विषय असण्याऱ्या उमेदवाराना का प्राधान्य देण्यात यावी याची कारण / सूचना खालील प्रमाणे ,

1..GATE परीक्षेची जाहिरात ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये निघून फेब्रुवारी - मार्च मध्ये परीक्षा होऊन निकाल लागलेले असतात.
ऊर्जा विभागातील ( mahatranco / mahagenco / mahadiscom ) जाहिरातिचे काही वेळापत्रक नसते.यामुळे ज्यांनी GATE 2021 दिली आहे तेच पात्र होतील.
आधीच 4 वर्षे झालीत ऊर्जा विभागात जाहिरात नाही त्यामुळे खूप मोठा वर्ग Mahatransco AE भरती पासून वंचित राहील.

2..Mahatransco AE ची काठिण्य पातळी वाढवून सरळसेवा द्वारे परीक्षा घ्यावी यामुळे सर्व उमेदवाराना संधी मिळेल.

3..तामिळनाडू राज्याच्या ऊर्जा विभागाने दहावीला तामिळ विषय असणाऱ्या उमेदवाराना प्राधान्य दिलं आहे मग महाराष्ट्रत का नाही..?

4..मुंबई महानगपालिकामध्ये दहावीला मराठी विषय असणाऱ्यानाच भरतीसाठी पात्र केले जाते.ऊर्जा विभागाने पण मुंबई महानगरपालिकाचे अनुकरण करावे.जेणेकरून महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थानां जास्तीत जास्त संधी मिळू शकेल.

5..मागील आठवड्यात स्वप्नील लोणकर या स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थीने शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आत्महत्या केली.राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना GATE मार्फत घेण्याचा अट्टहास का..?

6...केंद्र शासन व JEE च्या परीक्षा होत आहे तरी आपण पण Mahatransco AE ची भरती सरळसेवा द्वारे घेवुन बेरोजगार विद्यार्थीना दिलासा द्यावा.

7...28/11/2019 रोजी Mahagenco AE ची 43 पदासाठी जाहिरात आली होती.आज जवळपास 2 वर्षे झाली तरी त्याची परीक्षा झाली नाही.याबाबत तातडीने नियोजन करून योग्य ती कार्यवाही करा.

8..IN THE HIGH COURT JUDICATURE AT PATNA

CIVIL WRIT JURISDICTION
CASE NO - 8760 OF 2019
CASE NO - 9152 OF 2019

कलम 16 नुसार सर्वाना सरकारी नोकरीत समान संधी मिळाली पाहिजे.
तसेच पटना उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की GATE मार्फत परीक्षा घेणे हे भेदभाव ठरू शकते.
मुळातच GATE ही उच्च शिक्षण व शिष्यवृत्ती साठी असलेली चाचणी परीक्षा आहे

तरी आमच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून बेरोजगार विद्यार्थाचे होणारे नुकसान टाळावे.

आपला विनम्र

एक स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी
3166.pdf
672 KB
🛑Electrical Revise Advt 2019🛑
3165.pdf
830.7 KB
🛑Forest Revise Advt 2019🛑
🛑MPSC Breaking🛑
आयोगाने वनसेवा व अभियांत्रिकी सेवा(Electrical) 2019 च्या सुधारीत जाहिरात आज प्रसिध्द केल्या आहेत.
Join us @only_stdy
3189.pdf
1.2 MB
अभियांत्रिकी सेवा(Civil) 2019 सुधारीत जाहिरात
Join us @only_stdy
3235.pdf
1.2 MB
अभियांत्रिकी सेवा(Civil) 2020 सुधारीत जाहिरात
Join us @only_stdy
Forwarded from Only Study Official ©
mes mains book.pdf
326.5 KB
Emailing mes mains book.pdf
202107151245157907.pdf
243.4 KB
🛑 शासन निर्णय 🛑

विषय:- मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दि.५ मे,२०२१ च्या न्याय निर्णयाची अंमलबजावणी.
एसईबीसी प्रर्वर्गातील उमेदवारांच्या नियुक्ती बाबत.


या शासन निर्णयानंतर राज्यसेवा आणि combine व इतर परिक्षेच्या सुधारित जाहिरातीलवकरच जाहीर होतील. SEBC आरक्षण अंतर्गत असलेल्या सर्व जागा हे OPEN कॅटगोरी मध्ये रूपांतरित करून सुधारित निकाल लावण्यात येईल म्हणजेच आत्ता नियुक्तीचा मार्ग मोकळा !!!!!


@only_stdy
जरी बाप साऱ्या जगाचा परी तू,
आम्हां लेकरांची विठू माऊली।।

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐

कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होवो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना.

Join @only_stdy
⭕️2019-2020 आर्थिक वर्षाचे EWS प्रमाणपत्र (Validity Upto 31 March 2020) आवश्यक असणाऱ्या MPSC च्या परीक्षा.
Join us @only_stdy
🛑EWS प्रमाणपत्र बाबत🛑
⭕️मागील काही काळात आम्हाला 6 जुलै च्या GR च्या अनुषंगाने EWS सर्टिफिकेट कोणत्या वर्षाचे लागेल असे अनेक उमेदवारांचे ई-मेल 📩 प्राप्त झाले आहेत.
📌तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मागील काळात SEBC आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवलेले आहे.त्यामुळे प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रियेत SEBC मुलांना EWS देण्यास राज्यशासनाने विकल्प दिला होता.
⚠️6 जुलै च्या GR नुसार आता SEBC उमेदवारांना 2019-2020 च प्रमाणपत्र नव्याने काढावं लागणार आहे.
वरील फोटोमधील MPSC च्या जाहिरातीबरोबरच खालील जाहिरात मधील SEBC उमेदवारांना आता नव्याने 2019-2020 च मार्च 2020 पर्यंतच प्रमाणपत्र लागणार आहे.
♦️WRD JE 2019
♦️महावितरण पदभरती 2019
♦️Mahadiscom AE 2019
♦️इतर अन्य 2019 मधील पदभरती ज्यात EWS होते.
📣लवकरच MPSC च्या प्रलंबित असलेल्या भरतीचे निकाल लागून ऑगस्टमध्ये मुलाखती सुरू होतील तेव्हा हे प्रमाणपत्र लागेल.
🔴काही जिल्ह्यात SEBC उमेदवारांना 2019-2020 चे प्रमाणपत्र वितरित झाले आहेत.
जर सक्षम प्राधिकरण अधिकारी(तहसीलदार) 2019-2020 च प्रमाणपत्र देण्यास नकार देत असेल तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
🔻प्रत्येक जिल्ह्यातील SEBC उमेदवारांनी त्यांचे स्थानिक पातळीवर Group बनवून योग्य तो पाठपुरावा करून प्रमाणपत्र मिळवुन घ्यावे.
Join us @only_stdy