Only Study Official ©
12K subscribers
1.96K photos
42 videos
603 files
616 links
askteamonlystudy@gmail.com
Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Download Telegram
Only Study Official ©
Photo
🚨🚨#BreakTheChain - Modified Guidelines

🔸सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी. शनिवारी मात्र मात्र दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहतील.

🔸 सर्व ग्राऊंड, गार्डन्स हे व्यायामासाठी खुली ठेवण्यास मंजुरी.

🔸 सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी. फक्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

🔸 जी कार्यालयं वर्क फ्रॉम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी.

🔸कृषी, औद्योगीक, नागरी, दळणवळणाची कामं पूर्ण क्षमतेनं करण्यास मंजूरी.

🔸जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येतील. वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी.

🔸जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील तर रविवारी पूर्णपणे बंद.

🔸सर्व प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार.

🔸शाळा आणि महाविद्यालयांबाबत संबंधित विभागाच्या आदेशानुसार नियम लागू राहणार.

🔸सर्व रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेनं दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार. हा नियम सोमवार ते शुक्रवार लागू असेल. यावेळी कोरोना नियमांचं पालन बंधनकारक असेल. पार्सल आणि होम डिलिव्हरी सेवा सुरु राहणार.

🔸 रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार.

🔸वाढदिवस, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक, निवडणूक प्रचार, रॅली, मोर्चा, आंदोलनावर बंदी

🔸 राज्यभरात नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं. मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाणं बंधनकारक असणार आहे.

🔴पुढील ११ जिल्ह्यांसाठी जुनीच नियमावली कायम राहणार आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. हे सर्व जिल्ह्ये अद्याप कोरोना नियमावलीच्या लेवल तीनमध्येच कायम असणार आहेत. 

Join @only_stdy