MPSC Positive
21 subscribers
6 photos
1 file
3 links
Download Telegram
आंध्र प्रदेश सरकारचा अजून एक ऐतिहासिक निर्णय

आंध्र प्रदेश लोकसेवा आयोग (एपीपीएससी) भरतीमध्ये संपूर्ण पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने, आंध्र प्रदेश सरकारने गट -1 सेवांसह सर्व विभागांतर्गत असलेल्या सर्व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मुलाखती रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत.
आमच्या दोन वीताच्या पोटाची भ्रांत असणा-या मायबाप सरकारास...!!!

"सुप्त चैतन्य व निद्रीस्त शक्ती जागृत करण्याचे प्रभावी साधन म्हणजेच शिक्षण" असं विनोबा भावे सांगून गेले. पण, सध्याच्या घडीला एम.पी.एस.सी च्या अवकाशात शासकीय पदाची स्वप्न पाहणा-यांमधलं अभ्यासू चैतन्य अन् वैचारिक शक्ती दिवसेंदिवस क्षीण होत चाललीय. सरकारहो दिवसेंदिवस पुढे ढकलत चाललेल्या परीक्षांच्या तारखा, आयोगाकडून रखडलेले परीक्षांचे निकाल अन् वारंवार परीक्षापध्दतीचे बदलत चाललेले स्वरुप यां सर्व गोष्टींचा नकारात्मक परिणाम आता आम्हा एम.पी.एस.सी करणा-यांच्या मनाला असह्य चटके देत आहे.

एम.पी.एस.सी निवडणारे आम्ही, सामान्य नक्कीच नाही आहोत कारण या मार्गाद्वारे सामाजिक भान, सामाजिक जबाबदारी व सामाजिक कर्तव्य यांचा विडा उचलून जनसेवेचे व्रत आम्ही अंगिकारणार आहोत. सध्याच्या कोरोना व लॉकडाऊनच्या काळात आधीच जीव मुठीत घेऊन बसलेलो आम्ही, आयोगाच्या परीक्षेसंदर्भातल्या या प्रलंबित कार्यवाहीमुळे जीवाला मुकतो की काय अशी केविलवाणी परिस्थितीत कोंडलो गेलोय. रुपया रुपया जोडून कुणाची आई तर कुणाचा भाऊ आपलं पोरगं पास हुईल, आपलं नाव करील, सरकारी हापीसर हुईल ह्या आशेनं स्वत:च्या स्वप्नांचा चुराडा करुन, पोटच्या लेकरांना पैसे पाठवत आहेत. घोटभर चहाची वाणवा करुन, काही गरीब विद्यार्थी रिकाम्या पोटी, आतडी कळकळ करीत, स्वप्नांचाच घास करीत, पुस्तकांमधल्या प्रश्नोत्तरांनी आपलं पोट भरीत आहेत. या परिस्थितीत आयोगाच्या चालढकल धोरणांमुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतली पदाची स्वप्नं आसवांच्या रुपानं बाहेर पडत आहेत यासारखी निर्दयी चेष्टा दुसरी नाही असचं म्हणावं लागेल...!

मायबाप सरकार हो, संघर्ष हा एम.पी.एस. सी करणा-यांच्या केवळ रक्तातच न्हवे तर डी.एन.ए. मध्ये असतो हे कितीजरी सत्य असलं तरी, आयोगाचा अनागोंदी कारभार, विद्यार्थ्यांच वाढत चाललेलं वय, घरच अठराविश्व दारिद्र्य, समाज-नातेवाईक यांच्याकडून होणारी अवहेलना, या गोष्टी आचके उचके देत राहतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल दिवसेंदिवस खच्ची होत चाललेय. एज बार झाल्यानंतर, पद हातात नसल्यावर, बेरोजगारीचा फास ही आवळत चाललाय. एकेकाळी चांगल्या पगाराची विद्यार्थ्यांची स्वप्नं ही 'उधारीवर' विकली जात आहेत यासारखे दुर्देव नाही. एम.पी.एस.सी. चा धसका घेतलेले काहीजण 'आत्महत्त्येचा' विखारी मार्ग अवलंबू मोकळे झाले. जिथे स्वत:चा जीव देऊनही विद्यार्थ्यांना परीक्षासंदर्भातले न्याय्य धोरण वेळोवेळी मिळत नसेल त्या शिक्षण व नियमपध्दतीला काय म्हणावे ?

सरकार, तुम्ही लॉकडाऊन तर केलात, पण यामध्ये आम्हां विद्यार्थ्यांचे भवितव्यच 'लॉक' झालेय. दोन वेळच्या घासाची भ्रांत असणा-या घरांमधुनही एम.पी.एस.सी. चा अभ्यास करणारे कित्येक विद्यार्थी आहेत. त्यामुळे, दुष्काळात तेरावा महिना अशी लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची गत झाली आहे. काहीजण जवळचे पैसे संपल्याने शहरांतली लायब्ररी सोडून गावी परतले आहेत तिथे शेतात काम करुन, शेतातल्या ढेकळांमध्ये शासकीय अधिकारी पदाची पाहिलेली स्वप्नं विरघळतांना भरल्या डोळ्यांनी पाहायची वेळ त्यांच्यावर आली आहे.
या कोरोनाकाळात, मोर्चे, आंदोलने, बैठका हे चालते पण विद्यार्थ्यांच्या परीक्षा का चालत नाहीत? हा प्रश्न आम्हां विद्यार्थ्यांना स्वस्थ बसू देत नाहीय. स्वप्नांचा पाठलाग करताना आधीच दमछाक झालेला विद्यार्थी एम.पी.एस.सी. आयोगाच्या वेळखाऊ धोरणामुळे पार कोलमडुन गेलाय.

एम.पी.एस.सी. करणा-यांच आयुष्य हे अक्षरश: फाटलेल्या आभाळासारखं होत चाललय... कुठतरी चांगला अभ्यासाचे कष्ट करुन शिवण घालायला जावे पण दुसरीकडे आयोगाचे प्रलंबित व विलंबित धोरण सर्व प्रयत्नांची विण उसवून ठेवते. जिथ आभाळच फाटत चाललय तिथ कुठ व काय शिवत राहणार ? असा प्रश्न विद्यार्थ्यांना छळत आहे. मायबाप सरकार हो, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष़्याची धुळधाण होता कामा नये इतकंच. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता आयोगाकडून, एम.पी.एस.सी. च्या रखडलेल्या परीक्षा वेळच्या वेळी घेण्यात याव्यात परिस्थिती लक्षात घेऊन, योग्य परीक्षा धोरण राबवावे ही आपणांस कळकळीची विनंती....

आपलाच विश्वासू,
नी३ अहिरराव, पुणे
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
Mob : 8551975985
नर्मदा, कृष्णा, सतलज, सिंधू, चंबळ या सर्व नद्या घळ्या निर्माण करतात.
Anonymous Quiz
63%
38%
×
1) भारतीय सैन्याने 'मैत्री' नावाचा सर्वात
लांब सस्पेन्शन पुल कोणत्या नदीवर बांधला
Anonymous Quiz
17%
गोदावरी
42%
सिंधू
33%
महानदी
8%
गंगा
Q.2] RTI-ACT दुरुस्ती विधेयक 2019 नुसार RTI - ACT 2005 च्या कलम मध्ये
सुधारणा करण्यात आल्या.
Anonymous Quiz
25%
12
25%
15
50%
10
0%
6
३) भारतामधील पहिला रोबोटिक टेलिस्कॉप ______ या ठिकाणी स्थिथ आहे
Anonymous Quiz
13%
अलाहाबाद
20%
दिल्ली
53%
श्रीहरिकोटा
13%
त्रिवेंद्रम
४) जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतो
Anonymous Quiz
29%
उपाध्यक्ष
43%
जिल्हाधिकारी
7%
राज्यशासन
21%
विभागीय आयुक्त
६) ५० % आरक्षण ची मर्यादा खालील पैकी कोणत्या खटल्यामुळे घालण्यात आली
Anonymous Quiz
21%
केशवनांद भारती खटला १९७३
29%
एलआयसी वि भारत सरकार
43%
इंदिरा साहनी खटला १९९२
7%
चमपकंम दोराईराजन खटला १९५१
ऑनलाईन अर्ज प्रणाली: उमेदवारांचे खाते अद्ययावत करण्याबाबत
आयोगाचे प्रसिद्धीपत्रक
Join @MpscPositive
3875.pdf
780.9 KB
⭕️♦️⚠️संयुक्त पूर्वपरीक्षा प्रवेशपत्र जाहीर..

Combine Hall ticket
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
⭕️♦️⚠️संयुक्त पूर्वपरीक्षा प्रवेशपत्र जाहीर..

Combine Hall ticket काढण्यासाठी लिंक 👇👇👇👇

♦️ लिंक मध्ये मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर किंवा application number काही पण टाकून तुम्हाला हॉलतिकीट काढता येतील...


लिंक : 👇👇
https://eformsmpsc.org.in/admitCardLogin


➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
खालील लिंक मध्ये मोबाईल नंबर, आधार क्रमांक,अर्ज क्रमांक किंवा इमेल आयडी यापैकी कोणताही एक तपशील टाकून हॉलतिकीट काढता येईल.

👇Hall Ticket काढण्यासाठी लिंक...
https://mpsconline.gov.in

Join us @MPSCpositive
नमस्कार,

आता आपण Revision च्या अंतिम टप्प्यात आहोत.

बघा आता Economy साठी इथून पुढे नक्कीच Roadmap कसा असायला पाहिजे याविषयी थोडं बघूयात.

1.आता Revision करताना खालील घटक प्रधान्यक्रमाने करा.
फायदा होईल.

1. सार्वजनिक वित्त
2. करसंरचना
3. गरिबी व बेरोजगारी
4. शासकीय योजना
5. बँकिंग व RBI
6. कृषी उद्योग सेवा
7. परकीय व्यापार व व्यवहारतोल
8. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
9. पंचवार्षिक योजना
10.लोकसंख्या
11.राष्ट्रीय उत्पन्न
12.LPG
13. किंमती व चलनवाढ
14. मूलभूत संकल्पना

2. आता Pyq solving थोडं थांबवलं तरी चालेल.

जास्त Focus हा Content / Facts वरती दया. त्या चांगल्या Revise करून घ्या.

3.आता Basic books (कोळंबे / देसले जे वाचले असेल ते ) ची चांगली revision करून घ्या. कारण आत्ता जर Facts revise झाल्या नाहीत तर Exam मध्ये Confusion जास्त होते.

4.आयोगाच्या Trend शी Touch मध्ये राहण्यासाठी 2017,18,19 चे Pyq दररोज बघत चला.
हे सर्वच विषयांना लागू होते.

5. आणि कुठल्याच विषयाला Overestimate किंवा Underestimate करू नका Exam मध्ये Paper कसा येईल त्यानुसार प्रत्येक विषयचे Marks ठरत असतात.

So आत्ता फक्त Revision वरती Focus करा.

Aniket Thorat.
STI 2019
ASO 2019

👉The Achievers Mentorship.

सर्वांना शुभेच्छा.💐💐

Join @MPSCpositive✔️
लक्ष द्या जरा

१) कलमे
२) घटनादुरुस्ती
३) Table of Precedence
४) सूची
५) राज्य पातळीवरील राज्यव्यवस्था (राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ विधिमंडळ)
६) उच्च न्यायालय
७) Preamble, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, संघराज्य तत्व, संसदीय शासनप्रणाली, मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये, राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
८) सर्व संविधानिक व वैधानिक आयोग
९) निती आयोग व राष्ट्रीय विकास परिषद
१०) पंचायतराज बाबत आपण घेतलेलं
११) PYQs


हा आपला रिव्हीजन प्लॅन
एवढं नक्की करून घ्या
यातलं काही राहिले नाही पाहिजे.

Rohit Kale
ASO Rank 1
STI Rank 5

The Achievers Mentorship

Join @MPSCpositive✔️
Good morning Friends 💐💐

पुढच्या दोन तीन दिवसात राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे आणि काही ठिकाणी जोरदार चालू सुद्धा आहे, परीक्षेच्या दृष्टीने ज्यांचे सेंटर गावाकडे आहेत त्यांनी याची खबरदारी घेऊन पुढील नियोजन करावे!
⭕️♦️२२ जानेवारीच्या संयुक्त मुख्य परीक्षेच्या इंग्लिश पेपरसाठी एक महिन्याचे नियोजन कसे कराल?

✳️ यासाठी आवश्यक गोष्टी:-

१. तुमचे ३० दिवस.
२. दररोजचे ४ तास.
३. कुठलेही एक Reference book.(उदा. बाळासाहेब शिंदे/ एम.ज. शेख)
४. कुठलेही एक PYQ bank(उदा. बाळासाहेब शिंदे/ लोकसेवा publication)
५. आणि सर्वात महत्त्वाचे तुमची इच्छाशक्ती.😊

✳️ आपण English grammar चे एकूण १५ आणि Vocabulary चे ६ topics मध्ये विभागणी करुयात.English grammar:-

1.Noun
2.Pronoun
3.Adjective
4.Verb
5.Adverb
6.Preposition
7.Conjunction & complex-compound synthesis
8.Types of sentences & their transformation
9.Tense
10.Change the voice
11.Direct - Indirect speech
12.Degree
13.Clauses
14.Articles, Punctuation
15.Question tag, Moods


English Vocabulary:-

1.Idioms & phrases
2.Phrasal verbs
3.One word substitution
4.Confusing words
5.Synonyms
6.Antonyms

एका दिवसाचे नियोजन कसे कराल:-
रोज एकूण चार तास English grammar आणि vocabulary साठी देणे.
त्यातील दोन तास English grammar आणि दोन तास English vocabulary साठी.


English grammar करताना:-

दीड तास रोज एक grammar च्या topic ला द्या आणि अर्धा तास त्या topic वरील PYQ साठी.
उदा. आज Noun या topic पासून सुरुवात केली तर दीड तास noun हा topic वाचणे आणि अर्ध्या तासामध्ये noun topic वरील PYQ सोडवणे.
असा रोज एक topic केला तर १५ दिवसांत तुमचे वरील नमूद केलेले सर्व topics कव्हर होवून English grammar संपेल.


English vocabulary करताना:-

यामध्ये सुद्धा दीड तास vocabulary साठी आणि अर्धा तास PYQ साठी.
दीड तास vocabulary करताना वरील नमूद केलेल्या ६ vocabulary चे topics प्रत्येकी १५ मिनिटे म्हणजे एकूण दीड तास करणे.
Vocabulary चे एक विशिष्ट limit ठेवा, म्हणजे कुठल्याही refernce book मध्ये पाहिले तर असे समजेल की One word substitution, phrasal verbs आणि confusing words ची संख्या साधारणपणे २५० ते ३०० असते तर Idioms-phrases, sunonyms आणि antonyms ची संख्या साधारणपणे ४५० ते ५०० असते.
यासाठी, तुम्ही One word substitution, phrasal verbs आणि confusing words साठी प्रत्येकी २० शब्द प्रत्येक १५ मिनिटात करा तर Idioms-phrases, synonyms आणि antonyms साठी प्रत्येकी ३० शब्द प्रत्येक १५ मिनिटात करा.
आणि राहिलेल्या अर्ध्या तासात vocabulary वरील PYQ सोडवा.


✳️ एका महिन्याचे नियोजन कसे कराल:-
वरील सांगितल्याप्रमाणे English grammar आणि English vocabulary १५ दिवसांत संपेल, त्याला पुढच्या १५ दिवसांत पुन्हा एक Revision द्या म्हणजे एकूण एका महिन्यात तुमचे दोन वेळा वाचून होईल.
 
✳️ English चा अभ्यास करताना काळजी घ्यावयाच्या गोष्टी:-

१. जे refernce book आणि PYQ bank आत्तापर्यंत वाचले आहे त्यालाच वरील सांगितल्याप्रमाणे अभ्यासा.
२.एकाच शब्दावर किंवा एकाच प्रश्नावर(out of the box) फार जास्त वेळ अडकून पडू नका.
३.Vocabulary वाचताना रटाळ किंवा boring वाटेल परंतु त्याला वर सांगीतल्याप्रमाणे दिलेल्या allotted time मध्येच संपवण्याचा  प्रयत्न करा.
४.Mobile मध्ये suitable असे dictionary app असू द्या.
५.Grammar आणि vocabulary वाचताना स्वतःच्या convenient tricks बनवा.(Tricks जितक्या विचित्र तितकं लक्षात ठेवणे सोपे😉)
६.Grammar आणि vocabulary दोन्ही एकाच वेळी करण्यापेक्षा वेगवेगळ्या वेळी करा जसे की दुपारी दोन तास Grammar आणि रात्री जेवल्यानंतर दोन तास vocabulary.(म्हणजे सलग चार तास रटाळ वाटणार नाही)❇️ Bonus tip:-

नुकत्याच झालेल्या राज्यसेवा English question पेपरचे analysis करा, त्याचा नक्कीच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या २२ जानेवारीला फायदा होईल.

All The Best.


Ramdas Daund Sir
Deputy Collector 2019
ACF 2019
Section Officer 2018
ASO 2018

Join @MPSCpositive ✔️
नमस्कार ,

अशा आहे की तुमचा अभ्यास अगदी जोरात सुरु असेल. पण कसंय ना फक्त अभ्यास सुरु आहे असं म्हणून जमत नसतंय. त्यासाठी स्वतःला सारखं Cross - check करत राहावं लागत. सापळे लावावे लागतात.

हे Cross checking आपण कस करू शकतो बरं?

1.वाचलेल्या घटकवरील Pyq सुटत आहेत का?

2. त्या घटकातील एखादी संकल्पना समोर आली तर आठवते का? उदा. Lpg मधील उदारीकरण म्हटलं की त्यातील उपघटक लक्षात येतात का?

3.केलेल्या अभ्यासाचं थेट परीक्षेत Application होत का? की नुसतं वाचलेलं लक्षात राहत पण परीक्षेत काहीच आठवत नाही. हा issue बऱ्याच लोकांच्या बबतीत होत असल्याचे लक्षात आले आहे. त्यावर लवकर काम करा.

वरील तिन्ही गोष्टींची उत्तरे ज्यावेळी Yes येतील त्यावेळी समजून जा की तुम्ही यशाच्या अगदी काही पावले दूर आहात.

या प्रश्नांची उत्तरे Yes येण्यासाठी जोरदार प्रयत्न करा. मग यश आपलंच आहे.


Join@MPSCpositive