CivilMania
694 subscribers
176 photos
5 videos
102 files
47 links
All about Civil engineering
▪️Information about various competitive exams and their Recruitment process
▪️Discoveries in Civil engineering
▪️Motivational messages
🔥 Developing roads of success🔥
Visit : https://civilmania.in
✉️civilmaniaa@gmail.com
Download Telegram
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI/ASO/SA Cyber Crime)
#EXAM Date Update
Combine prelim आणि Engineering Prelim चे काय होईल?

याबाबत आपण बरेच जण विचारत आहात.
या प्रश्नाचे उत्तर द्यायच्या आधी थोडे सविस्तर लिहीतो,म्हणजे मग आपणच यातून काय तात्पर्य काढायचे ते काढा.

थोड्या वेळापूर्वी मा.विनोद पाटील यांचे भाषण मी ऐकले,ते मराठा आरक्षणातील मूळ याचिकाकर्ते आहेत.
त्यांचं असे म्हणणे आहे की नोव्हेंबर च्या शेवटपर्यंत मराठा अरक्षणावरील स्थगिती उठेल.
ईश्वर करो हे सत्य होवो ,म्हणजे आपल्या मराठा बांधवाना लवकरात लवकर न्याय मिळेल.

मित्रानो राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यामध्ये कोरोना आणि मराठा आरक्षण हे दोन मुद्दे होते. त्यात CM यांनी सांगितल्याप्रमाणे कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलायचा निर्णय घेण्यात आला.
पहिला मुद्दा कोरोना
CM च्या म्हणण्याप्रमाणे जर कोरोनाचे एकमेव कारण असेल तर येत्या अभियांत्रिकी व combine पूर्व साठी सुद्धा हीच परिस्थिती विचारात घेतली जाणार. कारण मित्रांनो तुमच्या माझ्या परिचयातले बरेच विद्यार्थी अजूनही Infected होतायत.त्यांचा देखील विचार आपण केला पाहिजे.
IAS सुधाकर शिंदे सर यांच्या दुर्दैवी मृत्यू चे ताजे उदाहरण समोर आहे.

दुसरा मुद्दा मराठा आरक्षणाचा,हा विषय आपण नीट समजून घ्यायला हवा.
जर आयोगाने परीक्षा घेतली तर निकाल नेमका कोणत्या base वरती लावणार?
नंतर मुख्य परीक्षेसाठी पुन्हा तोच प्रश्न
जर समजा मराठा आरक्षणला अंतिम स्थगिती मिळाली तर EWS पर्याय मराठ्यांना उपलब्ध होणार का?
हे आयोगाने आधी स्पष्ट करायला हवे.
जर परीक्षा झालीच आणि मी सांगितल्याप्रमाणे वरील घोळ निकालात झाले ,तर याविरुद्ध कोणी कोर्टात गेले तर ही परीक्षा कोर्टाच्या कटाच्यात सापडेल असे माझे वैयक्तिक मत आहे.
त्यामुळे सकळ मराठा समाजाची अशी मागणी होतेय की परीक्षा थोड्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात याव्यात.रद्द करायची मागणी नाहीय हे याठिकाणी लक्षात घ्यावे.

काही जणांची अशी मागणी आहे की आधी परीक्षा घ्यावी नंतर निकालाच्या वेळेस आरक्षणाचे बघता येईल? यावर मी कायदेतज्ज्ञाच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या ,तर त्यांचे असे म्हणणे आहे की जर असे झाले आणि निकाल राखून ठेवला तर परत कोणीतरी कोर्टात जाईल व आयोगाला आहे त्या स्थितित निकाल लावावा लागेल व मराठा समाजावर अन्याय होऊ शकतो.

शेवटी विद्यार्थी म्हणून आपले एकच कर्तव्य आहे की अखंड अभ्यास चालू ठेवा.परीक्षा ही होणारच आहे यावर दुमत नाही.

कोणावरही अन्याय होता कामा नये हीच अपेक्षा !

सर्वे भवन्तु सुखिनः