महासंवाद : महाराष्ट्र शासन
35K subscribers
8.88K photos
1.09K videos
106 files
14.4K links
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’

Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

#CabinetDecision
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मुंबईकरांना यावर्षीसुद्धा मालमत्ता कर वाढ नाही, राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार; २ लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार, 'मुख्यमंत्री वयोश्री' योजनेतून ६५ वर्षांवरील नागरिकांना लाभ देणार…यासह इतर मंत्रिमंडळ निर्णय पाहा.
#CabinetDecision
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

🔸राज्य शिखर संस्थेच्या कळंबोली येथील इमारतीसाठी शुल्क माफी.

🔸तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार.

🔸मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला.

🔸१३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.

🔸संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार.

🔸शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण.

🔸विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल.

🔸पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.

🔸हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’कडे योजना.

🔸संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार.

🔸राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार.

🔸ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ, ५० कोटी रुपयांचे अनुदान.

🔸भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप.

🔸संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार; गुन्ह्यांची वेगाने उकल करणार.

🔸वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन.

🔸राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी रुपययांचा अतिरिक्त निधी मंजूर.

🔸श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित.

#CabinetDecision